Skip to main content

Main navigation

तुमचे अनुभव सांगण्यासाठी मदतीचे मुद्दे:

आम्हाला तुमच्याबद्दल थोडे सांगा.

वाचकांना तुमची ओळख करून द्यावी. तुमच्या आवडीनिवडी सांगाव्या. तुम्हाला ज्या गोष्टी सांगण्यास योग्य वाटेल त्याच सांगाव्यात आणि खाजगी बाबी सांगणे टाळावे.

तुमचा हा अनुभव संग्न्यामाग्चे कारण काय आहे ते लक्षात घ्यावे.

तुम्हाला ह्याबद्दल जागरूकता वाढवायची आहे का तुम्हाला ह्यामधून मदत मागायची इच्छा आहे? जर तुमचा हेतू मदत मागायचा असेल तर आमच्या संसाधनांच्या विभागात जाऊन जरूर मदत घ्यावी.

तुमच्या अनुभवामधून लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?

अशा कुठल्या गोष्टी होत्या ज्यामुळे तुम्हाला सुसाईडचा विचार करण्यास भाग पडले? तुम्हाला तुमच्या खाजगी जीवनातील काही गोष्टी सांगायच्या असल्यास त्या सांगाव्या आणि लक्षात ठेवावे की हा एक खुला मंच आहे त्यामुळे तुमच्याबद्दल सांगण्यास योग्य वाटेल अशीच माहिती द्यावी.

सुसाईड संदर्भात येणाऱ्या विचार व भावनांच्या प्रतिबंधासाठी तुम्हाला आधार आणि माहिती कशी मिळाली हे आम्हाला सांगा.

तुमच्या अनुभवामधून जर वेळीच मदत मागणे, आशा बाळगणे आणि परिस्थितीशी सामना करणे अशा गोष्टींबद्दल माहिती मिळत असेल तर ती जरूर शेअर करावी. कुठल्या व्यक्ती, उपक्रम किंवा क्रिया करून त्याचा फायदा जर तुम्हाला झाला असेल तर त्याबद्दल थोडे बोलावे. ह्यामुळे परिस्थितीशी सामना करण्याची व मदत मागण्याची तुमची तयार झालेली क्षमता व त्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचेल.

तुमचा वर्तमानातील अनुभव सांगावा.

तुम्ही सध्या कसे आहात? तुमच्यात काय बदल झाला आहे? जीवन जगण्याची आशा आणि स्वतःसाठी काही करायची जिद्द तुम्ही कशी मिळवली? नेहमीच्या ताणतणावांचा तुम्ही सामना कसा करता? तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींबद्दल बोलावे तसेच तुम्ही जर कुठली मदत घेत असाल तर त्याची माहिती द्यावी जसे की सुरक्षा योजना. लोकांमध्ये आशावाद जागवावा.

तुमचे आशावादी विचार सांगावेत.

तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाकडे मागे वळून बघताना व भविष्याचा विचार करताना तुम्हाला सगळ्यात मोठी शिकवण कुठली मिळाली जी तुम्ही सर्वांना सांगू इच्छिता? तुमची कहाणी सांगणे महत्वाचे का आहे असे तुम्हाला वाटते?

तुमचा मजकूर 500-700 शब्दांमध्ये बसेल एवढा असावा. तुम्हाला जर अधिक प्रश्न असतील तर contact@outlive.in वर जरूर संपर्क साधा.

people

अनुभव सांगितलेल्या लोकांचे विचार:

मी माझी कहाणी सांगतो/सांगते आहे कारण अशा गोष्टीच माझ्या मदतीस धावून आल्या. सर्व आशा नाहीसे होत असताना ह्या गोष्टींची मला साथ मिळाली आणि त्यामुळेच मी स्वतःसाठी नव्या उमेदीने एक नवीन आयुष्य उभे करू शकले/शकलो.

सेंजुती, 22

people

अनुभव सांगितलेल्या लोकांचे विचार:

जर तुम्हाला सुसाईडबद्दल विचार येत असतील तर आउटलिवला आपली कहाणी सांगण्याआधी आपल्या जवळच्या प्रौढ व्यक्तीशी किव्हा मित्रांशी संवाद साधा किव्हा एखाद्या हेल्पलाईनशी संपर्क साधा. स्वतःची मदत करण्यासाठी ह्या संसाधनांचा वापर करावा.

सेंजुती, 22

तुमचा अनुभव सांगतानाचे काही प्रश्न

जर तुम्ही खालील कुठल्याही प्रश्नाचे उत्तर हो असे दिले तर तुम्ही आउटलिवद्वारे तुमचे अनुभव सांगू शकता.

  • तुमच्या मनात कधी सुसाईडचे विचार आले आहेत काय? किंवा त्यावर काही क्रिया झाली आहे का?
  • सुसाईडचे विचार येत असणाऱ्या किंवा तसा प्रयत्न करणाऱ्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही आधार दिला आहे का?
  • तुम्ही सुसाईडमुळे कुणाला गमावले आहे का?

सुसाईड बद्दल मोकळेपणाने बोलून त्यामागचे गैरसमज दूर करण्यास मदत होते. तरुणांना ह्यामुळे योग्य ते सहाय्य मिळू शकते. तुमचा अनुभव दुसऱ्यांसाठी प्रेरणा ठरू शकतो आणि ते ह्या लढाईत एकटे नाहीत ह्याचा विश्वास त्यांना मिळू शकतो.

तुम्ही तुमची कहाणी ब्लॉगरूपात, कविता, व्हिडियो, ऑडीयो किंवा कलेच्या सहाय्याने सांगू शकता. तुम्हाला तुमची ओळख निनावी ठेवायची असेल तर तुम्ही तसे करू शकता. जी सबमिशन्स ब्लॉगवर नाहीत ती ओपन लिंक द्वारे ड्राईव्ह किंवा ड्रॉपबॉक्सच्या मदतीने तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासोबत तुमच्या कहाणीबद्दल सविस्तर माहिती द्यावी की जेणेकरून वाचकांना त्याचा संदर्भ लागेल. आम्ही कुठल्याही पद्धतीची आत्महानी किंवा सुसाईड संदर्भातले फोटो, चित्र अथवा व्हिडीयो शेअर करणार नाही.

आउटलिव टीम तर्फे तुमच्या कहाणीचे शुद्धलेखन, व्याकरण, स्पष्टता, गोष्टीचा विस्तार तपासला जाईल आणि आमच्या संकलन नियमानुसार त्याचे संकलन केले जाईल. आपल्याला मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन तुमच्या सबमिशन मध्ये बदल सुचवले जातील. तुमचा संकलित अनुभव शेअर करण्याअगोदर तुमची परवानगी घेतली जाईल. ही कहाणी आउटलिव च्या वेबसाईटवर, व बाकी चॅनल्स वर प्रसारित केली जाईल (सोशल मीडिया, प्रेस रिलीज, न्यूजलेटर).

किती उपयुक्त हे पान होते का?

अभिप्राय आम्हाला आमची सामग्री आणि संसाधने सुधारण्यात मदत करतो जेणेकरून प्रत्येकासाठी अनुभव अधिक चांगला होईल.